वांगे पिकातून मिळवा "लाखोंचे उत्पन्न"
वांगे पिकातून मिळवा "लाखोंचे उत्पन्न"
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
वांगी हा भारतात सर्वाधिक वापरला जाणारा भाजीपाला आहे. त्याची लागवड वर्षभर करता येते. मात्र, भरघोस व गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवण्यासाठी योग्य तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. या लेखामधून आपण वांगे पिकाच्या लागवडीसंदर्भात चर्चा करणार आहोत.
![]() |
| Growth Stages of Brinjal Crop |
जमिनीची निवड -
वांगी लागवड करताना सुपीक, आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार जमीन असावी त्यामुळे चांगले उत्पादन मिळते.
जमिनीचा पीएच (pH) साधारणपणे 6.5 ते 7.5 या दरम्यान असणे आवश्यक आहे.
हवामान -
या पिकासाठी कोरडे व थंड हवामान आवश्यक असते. अशा वातावरणामध्ये पीक चांगले होते.
लागवडीचा हंगाम -
वांगी पिकाची लागवड ही तिन्ही हंगामात करता येते.
- खरीप हंगाम - जून- जुलै महिन्यात
- रब्बी हंगाम - ऑक्टोंबर- नोव्हेंबर महिन्यात
- उन्हाळी हंगाम - जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात
वांग्याच्या जातींची निवड कशी करावी ?
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात वांग्याच्या जाती ह्या वांग्याच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या आहेत , हे तर आपणास ठाऊकच आहे.
वांग्याच्या जातींची निवड शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व कोणत्या भागात कोणती वांगी घेतल्या जाते. म्हणजेच भागानुसार वांग्याची जातींची निवड करावी.
तसेच जास्त उत्पादन देणारे, कीड व रोग प्रतिकारक क्षमता असणारे वाण निवडावे.
जाती (Varieties of Brinjal Crop)
मांजरी गोटा, फुले अर्जुन, फुले हरित, कृष्णा, पंत बागवानी इ..
रोपांची लागवड -
वांगी लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करणे गरजेचे असते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी व भुसभुशीत होण्यासाठी शेणखताचा वापर करावा. लागवडीचे अंतर हे 45 × 45 किंवा 60 × 45 सेंटीमीटर असावे.
खत व्यवस्थापन -
१५-२० टन/प्रति हेक्टर शेणखत किंवा कंपोस्ट खत लागवडीच्या आधी जमिनीत मिसळावे.
प्रति हेक्टरी १२०-१५० किलो नत्र, ६०-८० किलो फॉस्फरस आणि ६०-८० किलो पोटॅश यांचे सुपर फॉस्फेट, युरिया आणि पोटॅशियम सल्फेट यांच्या स्वरूपात योग्य वेळी वापर करावा.
ड्रीप/आळवणी व्यवस्थापन -
१. पहिली आळवणी/ड्रीप द्वारे- (रोप लागणीनंतर ५ ते ६ दिवसांनी)
मर रोग नियंत्रणासाठी, रोपाच्या जोमदार वाढीसाठी तसेच अधिक पांढऱ्या मुळीसाठी
रूबी (१०० ग्रॅम/एकर) + पामेला (२०० ग्रॅम/एकर)
२. दुसरी आळवणी/ड्रीप द्वारे - (रोप लागणीनंतर १० ते १२ दिवसांनी)
फुटव्यांसाठी व रोपाच्या जोमदार वाढीसाठी. बेसल डोसचा अपटेक वाढवण्यासाठी
पोषक किट (१ किट/एकर) ड्रीप द्वारे दयावे.
फवारणी व्यवस्थापन
कळी अवस्थेमध्ये
एमिनो गोल्ड (१.५ ग्रॅम/लिटर) + टिबो (२ मिली/लिटर) यांची फवारणी करावी.
फायदे - फुलकळी वाढते, कळीचे फुलांमध्ये व फुलांचे फळांमध्ये रूपांतर होते. कळी, फुले व फळगळ थांबते.
.jpg)

Comments
Post a Comment