उसामध्ये एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादनाचे उद्दिष्ट गाठायचं आहे.....
उसामध्ये एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादनाचे उद्दिष्ट गाठायचं आहे.....
ऊस पिकाला नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखले जाते. याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात साखर उत्पादनासाठी केले जाते. ऊस पिकामध्ये योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी 100 टनाहूनही अधिक उत्पादन मिळू शकते.
उसाचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी जसे जमिनीची योग्यप्रकारे मशागत करणे, खतांचा संतुलित पुरवठा करणे, रोग व कीड व्यवस्थापन करणे, पाण्याचे नियोजन करणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे आहे उसाच्या बेण्याची बेणे प्रक्रिया करणे किंवा जर आपण रोपे लावत असु तर लागवडीपूर्वी त्यांची प्रक्रिया करणे. ऊसाचे बेणे म्हणजे कापलेल्या ऊसाचे बारीक तुकडे होय.
ऊस पिकामध्ये बेणे प्रक्रिया का महत्त्वाची आहे?

ऊस पिकामध्ये बेणे प्रक्रियेचे महत्त्व खूप मोठे आहे कारण ती पीक उत्पादन, गुणवत्ता आणि रोग नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक आहे. खाली दिलेल्या कारणांमुळे ऊस पिकामध्ये बेणे प्रक्रिया महत्त्वाची ठरते:
रोगप्रतिबंधक उपाय:
बेणे प्रक्रियेद्वारे ऊसाच्या बेण्यातून पसरणाऱ्या रोगांचा प्रभाव कमी करता येतो. यामुळे लाल सड, बुरशीजन्य रोग आणि इतर संसर्गजन्य रोग नियंत्रित करता येतात.उत्तम उगवणक्षमता:
प्रक्रिया केलेले बेणे चांगले रुजते, उगवणक्षमता वाढते आणि पीक निरोगी राहते.संपूर्ण वाढीसाठी मदत:
बेणे प्रक्रिया केली असता ऊसाच्या रोपांची मुळे अधिक मजबूत होतात आणि पिकाची वाढ झपाट्याने होते.कीड नियंत्रण:
प्रक्रिया केलेल्या बेण्यातून कीड कमी प्रमाणात आढळतात, ज्यामुळे उत्पादन अधिक चांगले मिळते.पीक उत्पादनवाढ:
बेणे प्रक्रियेमुळे उगवण पूर्ण आणि एकसंध होते, परिणामी एकसारख्या व चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते.खताचा कार्यक्षम वापर:
निरोगी बेण्यांमुळे मुळे आणि झाडांचा पोषणक्षमता अधिक चांगली होते, ज्यामुळे खतांचा योग्य वापर होतो.
बेणे प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणारे टप्पे:
- बेण्यावर योग्य प्रकारच्या जंतुनाशकांचा उपयोग.
- ऊस बेणांचे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक द्रावणात बुडवून ठेवणे.
- आवश्यक असल्यास पोषक द्रव्यांचा वापर करून बेणेला प्रक्रिया करणे.
शेतकरी बांधवांनो, सध्याच्या परिस्थितीत आपणास दिसत आहे की, रासायनिक खतांचा असंतुलित वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता कमी झाली आहे.
ऊस उत्पादक सध्या काय करताय की, अधिकचे उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करत आहात, त्यामुळे योग्य वेळी योग्य ते उत्पादन मिळते पण जमिनीची सुपीकता व तिचे आरोग्य ढासळत चालले आहे.
रासायनिक खतांच्या वापरामुळे काय होते की उत्पादनात वाढ होते पण मातीचे आरोग्य बिघडते, दीर्घकाळासाठी ज्या गोष्टी मातीत आवश्यक आहे जसे की सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी या रासायनिक खतांच्या वापरामुळे दीर्घकाळ मातीत टिकून राहू शकत नाही.
रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम
रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केल्याने जमिनीचे आरोग्य आणि पर्यावरणावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होतो. याचे काही महत्त्वाचे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:
जमिनीची सुपीकता कमी होणे:
रासायनिक खतांच्या सातत्याने वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता हळूहळू घटते.मातीचा सामु (pH) बिघडणे:
रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे मातीचा सामु असंतुलित होतो. यामुळे माती अत्यंत आम्लीय (acidic) किंवा क्षारीय (alkaline) बनते, ज्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होतो.मायक्रोबियल जीवनाचा नाश:
जमिनीत नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असणाऱ्या सूक्ष्मजीवांवर रासायनिक खतांचा विपरित परिणाम होतो. हे सूक्ष्मजीव मातीची पोत सुधारण्यात महत्त्वाचे योगदान देतात.मातीचा पोत खराब होणे:
रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे मातीचा पोत घट्ट होतो, ज्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी होते आणि मुळे योग्य प्रकारे श्वास घेऊ शकत नाहीत.पाणी आणि हवेचे प्रदूषण:
खतांतील नत्र (nitrogen) आणि फॉस्फरस (phosphorus) यासारखे घटक जमिनीच्या पाण्यात मिसळतात, ज्यामुळे भूगर्भातील पाणी दूषित होते. तसेच, हवेतील नायट्रस ऑक्साईड (nitrous oxide) वायूचे प्रमाण वाढते, ज्याचा परिणाम हवामान बदलावर होतो.जमिनीचा क्षारपडपणा वाढणे:
रासायनिक खतांचा अतिरेक झाल्यास जमिनीवर क्षारपडपणा तयार होतो, ज्यामुळे झाडांना आवश्यक पोषण मिळत नाही आणि उत्पादन कमी होते.पीक उत्पादनावर होणारा नकारात्मक परिणाम:
प्रारंभी उत्पादनात वाढ दिसली तरी दीर्घकालीन पातळीवर पिकांच्या गुणवत्तेत आणि उत्पादन क्षमतेत घट होते.

आम्ही खेतीवाले भैय्या या ब्लॉगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे घेऊन जातोय. जिवाणू खतांचा शेतीमध्ये वापर केल्याने उत्पादनात वाढ तर होतेच त्याचबरोबर मातीचे आरोग्य हे दीर्घ काळासाठी व निरंतर टिकून राहते.
जिवाणू खतांचा वापर जर आपण सुरुवातीपासूनच केला तर सहाजिकच त्याचा परिणाम हा त्या फक्त मर्यादित पिकासाठी नसून तर पुढे घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी सुद्धा होतो.
ऊसामध्ये आपण पहिल्या आळवणी पासूनच जिवाणू खतांचा वापर केला तर ही खते रासायनिक खतांचा अपटेक वाढवण्यास मदत करतात. 30-35 % रासायनिक खतांचा अपटेक हा जिवाणू खतांमुळे 70 ते 75% पर्यंत वाढतो.
जिवाणू खते कशाप्रकारे मदत करतात ते आपण पाहूया.
✅ जिवाणू खते हे सेंद्रिय शेतीतील एक महत्त्वाचा घटक असून ते पर्यावरणाचे संरक्षण करतात.
✅ जिवाणू खताद्वारे जमिनीतील जैव-रासायनिक क्रिया (Bio-Chemical Reaction) होतात त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
✅ सेंद्रिय पदार्थांचे लवकर विघटन( Decomposition) होते.
✅ बियाण्यांची चांगली व लवकर उगवण होते.
✅ पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
✅ जिवाणू खतांचा परिणाम व त्यांचा पुरवठा जमिनीमध्ये दीर्घकाळ टिकून राहतो.
✅ जिवाणू खतांमुळे नैसर्गिक अन्नद्रव्ये उपलब्ध होत असल्यामुळे रासायनिक खतांची मात्रा 20 ते 25 टक्क्यांनी कमी करता येते.
✅ पीक उत्पादनात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ होते.
ऊसामध्ये बेणे प्रक्रिया ही पहिली व महत्त्वाची प्रक्रिया असते, त्यासाठीच सुरुवातीपासूनच जिवाणू खते वापरण्यावर भर दिला पाहिजे.
![]() |
बेणे प्रक्रिया |
यावर सर्वोत्तम उपाय म्हणून आम्ही शिफारस करत आहोत एका दर्जेदार उत्पादनाची - रूबी
रूबी (Ruby)
वापरण्याचे प्रमाण -
बेणे प्रक्रिया करताना - 50 ग्रॅम/एकर
खतांचा डोस देताना - 100 ग्रॅम / एकर
🛒 Ruby उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी या संकेतस्थळांना भेट द्या -
- https://www.pranilagri.com/product/ruby/
- https://krishibazaar.in/product/ruby-bio-pesticides
रुबी वापरण्याचे फायदे -
1. १०० % उगवण क्षमता होते, रोपे सतेज व जोमदार दिसतात.
2. जमिनीमधून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.
3. रासायनिक खतांचा अपटेक वाढविण्यास मदत होते.
4. उत्पादनवाढीबरोबर जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
5. ऊसाची लांबी, दोन पेऱ्यांमधील अधिक अंतर व साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
6. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
निष्कर्ष-
यावरून हे लक्षात येते की, आपण जर आपल्या जमिनीमध्ये जिवाणू खतांचा वापर हा सुरुवातीपासूनच म्हणजेच बेणे प्रक्रियेपासून व पिकांच्या लागवडीपासूनच केला तर तरच आपल्याला उत्पादनात उत्कृष्ट अशी वाढ झालेली दिसेल. उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेलच त्याबरोबरच मातीचे आरोग्य देखील सुधारेल व तिची सुपीकता टिकून राहील.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !



Good Information
ReplyDelete