"पिकांना आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचे कार्य व त्यांच्या कमतरतेची लक्षणे"
आपणास ठाऊक आहे का? "पिकांना आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचे कार्य व त्यांच्या कमतरतेची लक्षणे"
पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करणे फार महत्त्वाचे असते.
त्यामुळे पिकास आवश्यक असलेली मुख्य दुय्यम व सूक्ष्म अशा सर्वच अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होतो तसे जमिनीची सुपीकता वाढवण्यास व टिकून ठेवण्यास मदत होते.
तसेच पिकातील अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकाची उत्पादकता कमी झालेली कमी झालेली दिसते. मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस जमिनीत व पिकांवर कमतरतेची लक्षणे आढळून येतात. अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा विपरीत परिणाम हा पिकांच्या वाढीवर की दिसून येतो.
अन्नद्रव्यांचे कार्य (Functions of plant Nutrients)
1) नत्र (Nitrogen)- पानांतील हरिद्रव्ये व प्रथिने वाढवतात.
- पिकांची शाखीय वाढ चांगली होते.
- पानांची व खोडाची वाढ झपाट्याने होते.
2) स्फुरद (Phosphorus)
- पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे
- बियाण्यांची उगवण, फळधारणा आणि फळाच्या परिपक्वतीसाठी आवश्यक असते.
3) पालाश (Potassium)
- उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
- फळांना चांगला रंग येऊन टिकवण क्षमता वाढते.
4) गंधक (Sulphur)
- पिकांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
- हरिद्रव्ये निर्मिती मध्ये मदत करते.
5) लोह (Fe)
- पानांतील हरितद्रव्ये तयार करण्यास मदत करते.
6) जस्त (Zinc)
- पाण्याचे शोषण व योग्य स्थलांतर करण्यास मदत करते.
7) कॅल्शियम (Calcium)
- फूल व फळधारणा - पिकांमध्ये फूल, फळधारणाक्षमता वाढविण्यासाठी कॅल्शियम मदत करते.
8) बोरॉन (Boron)
- मुळांची वाढ व पेशी तयार करण्यास मदत करते.
9) मॅग्नेशियम (Magnesium)
- पिकांमध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढवून पिके हिरवीगार ठेवतात.
- एंजाइम्स निर्मितीसाठी मदत करते
10) तांबे (Copper)
- प्रकाशसंश्लेषणातील प्रमुख कार्य करते.
- फळांत साखरेचे प्रमाण वाढवते
- फळे आणि भाज्यांची रंग, चव सुधारते
11) मँगनीज (Mn)
- प्रकाशसंश्लेषण आणि वनस्पतींच्या श्वसनासाठी मँगनीज (Mn) आवश्यक आहे.
- यामुळे हिरवा रंग सुधारतो आणि साखर आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते.
- मँगनीज उच्च प्रकाश तीव्रतेसाठी वनस्पतींची सहनशीलता वाढवते.
12) मॉलिब्डेनम (Mo)
मॉलिब्डेनम हे नायट्रोजनचे अमीनो ऍसिडमध्ये रूपांतर करणे आणि शेंगांमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण होते, ज्यामुळे जास्त उत्पादन मिळते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
![]() |
| Nutrient Deficiencies Symptoms |
1) नत्र - झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.
2) स्फुरद - पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.
3) पालाश - पानाच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.
4) जस्त - पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते. कळ्या सुरकुतलेल्या असतात. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.
5) लोह - लोहाच्या कमतरतेमुळे पानांत पुरेसे हरितद्रव्य तयार होत नाही, त्यामुळे नवीन येणारी कोवळी पाने पिवळसर दिसतात व नंतर पाने गळून पडतात.
6) मॅंगेनीज - पिकांच्या पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा, नंतर पांढरट व करडा होतो. कोवळी पाने फिक्कट पिवळसर दिसून येतात.
7) तांबे - पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात. कणसात किंवा ओंबीत दाणे भरत नाही.
8) बोरॉन - टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने मरतात. टोमॅटो, डाळिंबामध्ये फळ तडकते.
9) मॉलिब्डेनम - पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात, पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.
10) गंधक - झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी पडतात.
11) कॅल्शियम- कळ्या, फुले व फुलोरा गळतो, कोवळ्या पानांच्या कडा वेड्या वाकड्या होतात.
12) मॅग्नेशियम - देठ, पानाच्या कडा व शिरांमधील भागांचा हिरवा रंग कमी होतो. पिकांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !



Comments
Post a Comment