जाणून घेऊया झिंक ह्या अन्नद्रव्याचे गहू पिकातील महत्व..
जाणून घेऊया झिंक ह्या अन्नद्रव्याचे गहू पिकातील महत्व..
शेतकरी बांधवांनो आपणास हे ठाऊकच आहे की,
गहू हे भारतातील एक प्रमुख अन्नधान्याचे पिक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्यांच्या पिकांपेक्षा जास्त आहे.
भारतामध्ये प्रामुख्याने पंजाब, हरियाणा उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यात गव्हाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते.
गव्हाचे पीक घेण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत जमीन असावी. शक्यतो हलक्या जमिनीत गव्हाचे पीक घेण्याचे टाळावे. तसेच आपण सध्या बघत आहोत की काही जमिनींमध्ये झिंक या अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यामुळे गव्हाच्या पिकावर त्याचा परिणाम दिसून येतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण या लेखामध्ये गव्हामधील झिंक या अन्नद्रव्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत.
झिंक च्या कमतरतेची लक्षणे-
- झिंक च्या कमतरतेमुळे गहू या पिकाची वाढ होत नाही.
- पाने पिवळी पडतात.
- गव्हाची पाणे लहान व अरुंद होतात.
- हरिद्रव्यांचा अभाव होऊन खालच्या बाजूच्या पानांवरील हिरवा रंग नाहीसा होतो.
- गव्हाच्या दाण्यांची गुणवत्ता ढासळते.
चला तर मग, आता आपण जाणून घेऊया गव्हासाठी झिंक हे अन्नद्रव्य का महत्त्वाचे आहे?
- झिंक हा गहू पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
- शेतात झिंक टाकल्याने गव्हाचे पीक वेगाने वाढते.
- त्याचे पाणे हिरवी होतात त्यामुळे उत्पन्न देखील वाढते.
- झिंक हे अन्नद्रव्य गव्हामध्ये पानांची हिरवळ टिकवून ठेवते.
- गव्हाच्या दाण्यांचा आकार व वजन वाढते.
- पोषणमूल्य सुधारते आणि दर्जेदार उत्पादन देते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
गहू पिकामधील झिंक या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत,
टिराॅन न्यूट्रिशन प्रा.लि चे दर्जेदार उत्पादन झिंकाॅन
गहू पिकाच्या भरघोस व गुणवत्तापूर्वक उत्पादनासाठी..
दर्जेदार उत्पादन - झिंकाॅन
फायदे -
* झिंकाॅन हे जलद प्रभावी झिंक मायक्रोन्यूट्रिएंट असल्याने पिकाची वाढ जोमदार होते.
* झिंकाॅन हे गहू पिकात पानांची हिरवळ टिकवून ठेवते.
* प्रोटीन निर्मितीत हे महत्त्वाचे कार्य करत असल्याने गहू पिकात दाण्यांची परीपक्वता उत्कृष्टरित्या होते.
* गव्हाच्या दाण्यांना उत्कृष्ट आकार, वजन व चकाकी प्राप्त होते.
* पोषण मूल्य सुधारते आणि दर्जेदार उत्पादन मिळते.
वापरण्याचे प्रमाण -
ड्रिप किंवा फवारणी द्वारे - 500 मिली/एकर
झिंकाॅन उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://www.pranilagri.com/product/zincon-zinc-oxide-39-5/
अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 7757092091 या नंबरवरती संपर्क करू शकता.
.jpg)


Comments
Post a Comment