"थंडीमध्ये द्राक्ष बागेत दिसणाऱ्या समस्या व त्यासाठी परिणामकारक असा उपाय!"
"थंडीमध्ये द्राक्ष बागेत दिसणाऱ्या समस्या व त्यासाठी परिणामकारक असा उपाय!" नमस्कार शेतकरी मित्रांनो, थंडीचे दिवस द्राक्ष पिकासाठी ताणाचे असतात. रात्रीची कडाक्याची थंडी, दव, थंड वारं आणि कमी तापमानामुळे द्राक्ष बागेत अनेक समस्या दिसू लागतात. योग्य निरीक्षण आणि वेळेवर केलेली काळजी या समस्या कमी करण्यास मदत करते. चला तर मग थंडीमध्ये द्राक्ष बागेत दिसणाऱ्या प्रमुख समस्या आणि त्यावरील उपाय पाहूया. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- द्राक्षबागायतदार बंधूंनो, वाढत्या थंडीचा फटका द्राक्ष बागेला बसतो, त्यामध्ये खालील लक्षणे दिसत आहेत का? थंडीचा द्राक्ष बागेवर होणारा परिणाम - 1) पानांचा रंग बदलणे - अँथोसायनिन साचणे त्यामुळे पानं जांभळी/लालसर दिसू शकतात. 2) वाढ थांबणे - शेंडा (shoot tip) कडक होऊन थांबतो.सेल-डिव्हिजन मंदावल्याने फुलकळी/नवीन कळी लहान राहतात. 3) फुलकळी चा विकास होत नाही - फुलकळी (Bud) पूर्ण विकसित न होता under-developed राहू शकते. 4) मुळांची क्रिया कमी होते (Root Activ...